पुनश्च विजयी करण्यासाठी यांनी कसली कंबर
बेळगाव :माजी नगरसेविका सुधा भातकांडे यांना पुनश्च विजयी करण्यासाठी माजी लोकप्रतिनिधींसह प्रभागातील पंच मंडळी व युवा कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे.त्यामुळे प्रभाग क्र. 23 मध्ये मराठी भाषिक उमेदवार माजी नगरसेविका सुधा भातकांडे यांचा धडाक्यात प्रचार करण्यात दंग आहेत .यावेळी जेड गल्ली, मेलगे गल्लीसह शहापूर भागातील नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा सुधाताईना व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी त्यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या.याआधी महागनगर पालिकेमध्ये सुधाताईनी उत्कृष्ठ काम करून आपल्या प्रभागाचा विकास केला आहे. मात्र त्यापेक्षा ही अनेक कामे उत्कृष्ट कामे करून मराठी माणसाबरोबरच इतर धर्माच्या नागरिकांना देखील चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मानस आहे. यावेळी सुधाताई यांना जेड गल्लीतील नागरिकांचा शिवतीर्थ समर्थ युवक मंडळाचा, आणि महिला मंडळाचा पाठिंबा असल्याचे दर्शविण्यात आले. याप्रसंगी सुधाताई यांच्यासोबत या प्रचार फेरीत महाराष्ट्र एकीकरण समिती युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके हे उपस्थित होते.