शाहूनगरचा परिसर या उमेदवाराने दणाणून सोडले
बेळगाव : कुडचीचे आमदार पी राजीव यांच्या उपस्थित आज वॉर्ड नंबर 34 मधील बीजेपीचे अधिकृत उमेदवार श्रेयस नाकाडी यांच्या प्रचाराचाला शाहू नगर मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी शाहू नगर मधील दत्त मंदिरात देवाची पूजा करून प्रचार फेरीला सुरुवात करण्यात आली. सामाजिकतेचा ध्यास घेतलेल्या श्रेयस नाकाडी हे माणुसकी जपणारे , सतत कार्यतत्पर असणारे युवा उमेदवार आहेत. आपला वॉर्ड, आपली माणसे कधीही अडचणीत असू नये. त्यांच्या सेवेसाठी नेहमी धावणारे श्रेयस हे उमदे व्यक्तिमत्व असणारे उमेदवार आहेत. त्यामुळे
त्यांना बहुमताने निवडून आणण्याचा संकल्प यावेळी गल्लीतील कार्यकर्ते, महिलांना केला. यावेळी बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी श्रेयस यांचा प्रचार करून शाहू नगरचा परिसर दणाणून सोडला.