नेहरू नगरमधील नागरिक शिवा चौगुलेंच्या पाठीशी, अपक्ष उमेदवार शिवा चौगुलेंचा नेहरूनगरमध्ये जोरदार प्रचार
बेळगाव: महानगरपालिका निवडणूक 2021 चे वार्ड नं 18 चे अपक्ष उमेदवार शिवा चौगुले यांनी दणदणीत प्रचाराला सुरुवात केली आहे.त्यांनी गेल्या दोन तीन दिवसांपासून वार्ड नंबर 18 मधील सर्व भागांमध्ये प्रचाराला सुरूवात केली आहे. त्याचप्रमाणे आजही म्हणजे रविवारी नेहरूनगर मध्ये शिवा चौगुले यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह प्रचार केला. पुढील काळात वार्डातील ड्रेनेज, गटारी, रस्ते, पाणी यासह इतर कोणत्याही समस्या असोत. त्या ताबडतोब मार्गी लावू असा विश्वास दाखविला. यावेळी नेहरू नगर मधील नागरिकांनी त्यांना पाठींबा असल्याचे दर्शविले. तसेच त्यांच्या आम्ही सर्वजण पाठीशी आहोत असा असल्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी शिवा चौगुले यांना हत्तीचे बळ मिळण्याचे समाधान प्राप्त झाले.