महाराष्ट्र एकीकरण समितिचे वॉर्ड क्रमांक 8 मधील अधिकृत उमेदवार म्हणून वकील अमर येळूरकर यांच्या प्रचाराला दमदार सुरुवात
बेळगाव: महाराष्ट्र एकीकरण समितिचे वॉर्ड क्रमांक 8 मधील अधिकृत उमेदवार म्हणून वकील अमर येळूरकर यांची घोषणा करण्यात आली आहे.वॉर्ड मधील पंच मंडळ आणि युवक मंडळांनी अमर येळूरकर यांची समितीचे अधिकृत उमेदवार म्हणून निवड केली आहे.
समितीचे उमेदवार अमर येळूरकर यांनी पंच मंडळी आणि वॉर्ड मधील मान्यवरांच्या उपस्थितीत आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला. चवाट गल्लीतील मारुती मंदिरात त्यांनी दर्शन घेवून मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ केला.यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला देखील पुष्पहार घालून वंदन करण्यात आले.यावेळी वॉर्ड मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मराठी भाषा,संस्कृती यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी मी सदैव कार्यरत राहीन.मराठी भाषिकांवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी आणि मराठी भाषिकांचा प्रतिनिधी म्हणून सर्वांगीण विकास करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन असे उदगार उमेदवार अमर येळूरकर यांनी काढले.