बीएसए प्रशिक्षण केंद्रातील मुलीकडून रक्षाबंधन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला
बेळगाव:तालुक्यातील मुतगा येथील बीएसए प्रशिक्षण केंद्रातील मुलीकडून रक्षाबंधन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. प्रशिक्षण केंद्रातील 170 मुलांना राखी बांधून पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला.
यंदा प्रथमच हा सोहळा नव्याने करण्यात आल्याने मुतगा परिसरात चर्चेचा विषय ठरला. मुतगा परिसरात रक्षाबंधनाच्या दिवशी दिवसभर उत्साह असतो मात्र या वर्षी विकेंड लॉकडाऊन असल्यामुळे अनेक बहिणी दुपार होण्याआधीच आपल्या भावाच्या घरी जाऊन राखी बांधून आल्या. बीएसए प्रशिक्षण केंद्रात यंदा प्रथमच सामूहिक रक्षाबंधन सोहळा करण्यात आला. केंद्रात बहीण भावाचे नाते घट्ट व्हावे म्हणून हा सोहळा बाळकृष्ण पाटील प्रशिक्षक बी एस ए ग्रुप मुतगे यांच्या नेतृत्वाखाली पार पडला.