विद्या भारती जिल्हास्तरीय कार्यशाळा उत्साहात
बेळगांव ता, 21. आगामी शैक्षणिक वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरण राबविण्यास सकारात्मक असून विद्यार्थ्यास पायाभूत साक्षरता व तंत्रज्ञान आत्मसात व बौद्धिक विकास व अध्यायानाच्या तत्वावर आधारित अभ्यासक्रम विकसित करण्यात आला आहे यासाठी शिक्षकांनी तयार राहणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन उमेश कुमार यांनी विद्याभारती कार्यशाळेत काढले.
अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी शाळेच्या सभागृहात विद्याभारती बेळगाव जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन शनिवार ता, 21 रोजी सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आले होते. या कार्यशाळेत विद्याभारती क्षेत्रीय सहसंघटन कार्यदर्शी जी,आर जगदीश, विद्या भारती प्रांतीय संघटन कार्यदर्शी उमेश कुमार ,विद्याभारती राज्य अध्यक्ष परमेश्वर हेगडे ,सहसचिव सुजाता दप्तरदार ,विद्याभारती बेळगांव जिल्हाध्यक्ष राघवेंद्र कुलकर्णी,या मान्यवरांच्या हस्ते सरस्वती, ओमकार, भारतमाता फोटो पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले.आर,के, कुलकर्णी यांनी उपस्थित पाहुण्यांचा परिचय करून दिला तर सुजाता दप्तरदार व चंद्रकांत पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.यानंतर परमेश्वर हेगडे, जी, आर जगदीश यांनी विद्या भारतीच्या कार्याचा आढावा घेतला तर उमेश कुमार व ॲड चेतन मणेरीकर यांनी नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण याबद्दल माहिती दिली.त्यानंतर संलग्नित शाळेच्या मुख्याध्यापिकानी आपल्या शाळेच्या वार्षिक. योजनेचे माहिती दिली.या बैठकीला जयंत तिनईकर, सदानंद कपिलेश्वरी, रामनाथ नाईक,माधव पुणेकर, मुख्याध्यापिका डॉ बी अनिलकुमार, विजयालक्ष्मी पाटील, श्रध्दा पाटील, ज्योती कित्तुर, ऋतुजा जाधव,सह या कार्यशाळेत संत मीरा मराठी स्कूल, शांती निकेतन स्कूल खानापूर, स्वामी विवेकानंद स्कूल ,हनिवेल इंग्लिश मीडियम स्कूल खानापूर, देवेंद्र जिनगौडा इंग्रजी स्कुल ,संत मीरा इंग्रजी शाळा अनगोळ, लोंढा एज्युकेशन सोसायटी लोंढा, व रामदुर्ग तालुक्यातील विद्याभारती संलग्नित शाळेतील मुख्याध्यापक, शाळा सुधारणा समिती सदस्य, व विषय प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिती कोलकार तर सुजाता दप्तरदार यांनी आभार मानले.