श्रावण मासात भक्तिभावाने केल्या जाणाऱ्या वरमहालक्ष्मी व्रतावर देखील कोरोनाचा परिणाम झाला आहे.
श्रावण मासात पौर्णिमेच्या जवळील शुक्रवारी वरमहालक्ष्मी देवीचे पूजन केले जाते.सुहासिनी वरमहालक्ष्मी देवीचे पूजन भक्तिभावाने करतात.पूजेसाठी आवश्यक असणाऱ्या साहित्याची खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत महिलांची गर्दी होते.पण या वर्षी कोरोना चे सावट असल्याने बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी दिसून आली नाही.पूजेसाठी आवश्यक साहित्याची विक्री करण्यासाठी बाजारात विक्रेते बसले होते.पण त्यांच्या कडील साहित्याची म्हणावी तशी विक्री झाली नाही.पूजेसाठी लागणाऱ्या दिवे,केवडा,फुले,हार ,सुगंधी द्रव्ये ,उदबत्ती,पाच प्रकारची फळे आदी साहित्य खरेदी करणाऱ्यांची विक्रेते वाट बघत असल्याचे दृश्य पाहायला मिळाले. केवडा आदी विक्री करण्यासाठी परगावाहून विक्रेते आले होते.पण त्यांना प्रतिसाद मिळाला नाही.दरवर्षी वरमहालक्ष्मी व्रताच्या आदले दिवशी बाजारपेठेत खरेदीसाठी झुंबड उडालेली असते.पण यावर्षी कोरोनामुळे फळे,फुले,दुवे आणि सुगंधी द्रव्ये विकणाऱ्या विक्रेत्यांना फटका बसला आहे.