वंटमुरी कॉलोनीतील 33 नंबर प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना दूध पावडरचे वाटप
बेळगाव: सोमवारी वंटमुरी कॉलोनीतील 33 नंबर प्राथमिक शाळेमध्ये मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने ,मुलांचे पोषण वाढविण्याच्या हेतूने सरकार कडून आलेल्या दुध पावडरचे वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके हे उपस्थित होते.आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते शाळेतील मुलांना दूध पावडरचे वाटप करण्यात आले.
यावेळी एस टी कोलकार, दत्त बिरादार, ज्योती हालतेन्नावर,सुधीर संभाजी, गोपी लमानी ,आनंद बिलावर ,भारती पी के संतोष, उपस्थित होते.