कर्जबाजारी झाल्याने एका विणकर राने गळफास घेवून आत्महत्या
बेळगाव: कर्जबाजारी झाल्याने एका विणकर राने गळफास घेवून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली.खासबाग येथील शांती वसाहतीतील शामसुंदर नरेगल (४७) याने कर्जाबजारी झाल्याने गळफास घेवून आपले जीवन संपवले.व्यवसाय ठीक चालत नव्हता तसेच जी एस टी आणि लॉक डाऊन यामुळे शामसुंदर आर्थिक संकटात सापडला होता.बँक आणि सोसायटी मधून त्याने साडे चार लाख रुपये कर्ज घेतले होते.कर्जाचे व्याज देखील भरणे शामसुंदर याला अवघड झाले होते.कर्जाचा बोजा आणि कुटुंबाचा चरितार्थ चालवणे अवघड झाले होते.त्यामुळे शामसुंदर याने गळफास घेवून आत्महत्या केली.