मंडोळी गावातील गावरान जमीन कचरा डेपोसाठी देणार नाही
बेळगाव: मंडोळी ग्रामस्थांच्यावतीने जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. मंडोळी गावातील गावरान जमीन प्रशासन कचरा डेपो निर्मितीसाठी घेण्याच्या हेतूने कार्य करत आहे .गावातील गावरान जमीन कचरा डेपोसाठी वापरू नये अशी मागणी निवेदनाद्वारे मंडोळी ग्रामस्थांच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली. कचरा डेपो निर्मितीमुळे गावांमध्ये दुर्गंधीचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे .यामुळे गावामध्ये अनेक रोगराई पसरू शकते.त्याचप्रमाणे गावरान जमिनीवर कचरा डेपो केल्याने गावातील गाई-म्हशींना चारविण्यासाठी चारा मिळणार नाही. यासाठी कचरा डेपो करायचा निर्णय सरकारने मागे घ्यावा अशी विनंती करण्यात आली.
याप्रसंगी वकिली सुधीर चव्हाण बोलताना म्हणाले की मंडोळी गावची जमीन अनेक कारणासाठी सरकारने सरकारने काबीज केली आहे. आणि जर ही जमीन सुद्धा सरकारने घेतले तर गावातील लोकांना जनावरांना चारविण्याकरिता जमीन राहणार नाही असे ते म्हणाले.