स्पर्धात्मक परीक्षेतील साधकांचा शिक्षण खात्याच्या वतीने गौरव
दरवर्षी शिक्षण खात्याच्या वतीने NMMS व NTSE स्पर्धात्मक परीक्षा आयोजित करून यशस्वी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते . ही परीक्षा आठवी व दहावीच्या विद्यार्थ्यांना घेतली जाते . 2020-21 या शैक्षणिक वर्षात घेतलेल्या परीक्षेत बेळगाव शहरातील 51 विद्यार्थी शिष्यावेतनचे साधक ठरले आहेत. या विद्यार्थ्यांना प्रत्येकी दर महिन्याला 1000/- रुपये प्रमाणे च्यार वर्षे असे एकूण 48000/- रुपये मेरिट शि्यवृत्ती मिळणार आहे . या साधकांचा शिक्षण खात्याच्या वतीने गौरव करण्याचा कार्यक्रम मंगळवार दिनाकं 10 ऑगस्ट रोजी श्रीमती उषाताई गोगटे कन्या विद्यालयात आयोजित केला होता . रोटरी क्लब ऑफ वेनुग्राम चे अध्यक्ष अरविंद खडबडी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर अध्यक्षस्थानी शहर गट शिक्षाधिकारी रवी बजंत्री उपस्थित होते . या कार्यक्रमात 51 विद्यार्थ्यांचा पुष्प व प्रमाण पत्र देऊन गौरव करण्यात आले . या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेल्या राजेन्द्र भंडारी, एन एम मदनभावी , मडवळी अंगडी व सी पी देवरूषी या शिक्षकांचा सत्कार केला . रोटरी क्लबच्या वतीने विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेला सहाय करणारी पुस्तके शाळांनादेण्यात आली रोटेरियन विनयकुमार बाळीकाई , प्रसाद कट्टी, उमेष रामागुरवाडी मुख्याध्यापक एम के मादार , शिक्षण अधिकारी रिजवान नावगेकर , श्रीमती तिगडी , परवीन नदाफ उपस्थित होते . या कार्यक्रमास शिक्षक, पालक व वद्यार्थी उपस्थित होते.