राष्ट्रीय हातमाग दिनाच्या निमित्त अंगणवाडी शिक्षिका आणि आशा कार्यकर्त्याच्या कार्याचा सन्मान
बेळगाव: राष्ट्रीय हातमाग दिनाच्या निमित्ताने भाजप बेळगाव ग्रामीण महिला मोर्चा वतीने भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत, ज्योती कुलकर्णी आणि चेतना अगसगेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजप बेळगाव ग्रामीण महिला मोर्चाच्या सदस्यांनी सुळेभावी येथील हातमाग केंद्राला भेट देऊन साड्या निर्मितीचे तंत्र समजावून घेतले.
केंद्रातून साडया खरेदी करून कोरोना वारीयर अंगणवाडी शिक्षिका आणि आशा कार्यकर्त्याच्या उत्तम कार्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी भाजप महिला मोर्चा सदस्य अंगणवाडी कर्मचारी तसेच आशा कार्यकर्त्या उपस्थित होत्या.