आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिनाचे औचित्य साधून चेकमेट स्कूल ऑफ चेस आणि बेळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना यांच्यावतीने 16 वर्षांखालील बुद्धिबळपटूंकरिता बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत सुमारे 45 बुद्धिबळपटूंनी भाग घेतला होता. स्पर्धेतील पहिल्या दहा विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली. शिवाय चेकमेट स्कूल ऑफ चेसच्या विद्यार्थ्यांना विशेष बक्षिसे देण्यात आली.
बेळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष निलेश भंडारी, उपाध्यक्ष दत्तात्रेय डी. राव, चेकमेट स्कूल चेसचे प्रशिक्षक आणि स्पर्धा संयोजक गिरीश बाचीकर यांच्या उपस्थितीत बुद्धिबळ स्पर्धेला चालना देण्यात आली.
स्पर्धेत श्रीकरा दरभा, प्रणव आनंदाचे, योगराज महाले, साई मंगनाईक, माधव राव, निश्चल सखदेव, अवनीश बोरकर, अनिरुद्ध राव, सौरिष व्यास, समृद्ध बोरकर यांनी अनुक्रमे पहिले 10 क्रमांक पटकाविले. या विजेत्यांना रोख रक्कम आणि चषक देऊन गौरवण्यात आले.
स्पर्धेत चेकमेट स्कूल ऑफ चेस च्या विद्यार्थ्यांना विशेष पारितोषिके देण्यात आली. यामध्ये अद्वय मनोळकर, श्रीष्ठा अंगडी, अर्णव धारवाडकर, आर्या बुरसे, अमोघ गवीमठ, वेदांत के, इरा देसाई, समर्थगौडा पाटील, आदिती कोप्पळकर, शिवचित जत्ती, समर्थ तूबाकी, खुशी येळ्ळूरकर, समर्थ राणे, दक्ष देसाई, सिद्धार्थ हेडा, ईशा व्यास, लिखितेश एल. यांचा समावेश आहे.