आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झालेल्या स्पर्धकांना प्रियांका जारकीहोळी यांनी केली आर्थिक मदत
गोकाक :नेपाळमध्ये 10 ऑगस्ट पासून सुरु होणाऱ्या 19 वर्षा खालील वयोगटातील इंडो-नेपाळ आंतरराष्ट्रीय कब्बडी स्पर्धेमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी बेळगाव जिल्ह्यातील मोडलगी तालुक्यातील मेळवंकी गावातील सिद्दप्पा हंजे व तपसी गावातील मल्लप्पा नायक यांना प्रत्येकाला प्रवेश फी आणि प्रवास खर्च युवा नेत्या प्रियांका जारकीहोळी यांनी देऊन मदत केली.
केपीसीसी कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांच्या सूचनेनुसार मंगळवारी गोकाक मधील हिल गार्डन कार्यालयामध्ये काँग्रेस युवा नेत्या प्रियंका जारकीहोळी यांनी दोघा कबड्डी क्रीडापटूंना आर्थिक सहाय्य प्रोत्साहन केले व त्यांच्या स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छाही दिल्या यावेळी पांडु रंगसुबे मेळवंकी गावातील प्रमुख नेते उपस्थित होते.
.