कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर असणाऱ्या कोगनोळी चेक पोस्टवरून कर्नाटक परिवहन ची बस आणि खासगी ट्रॅव्हल बस परत महाराष्ट्रात पाठवण्यात आल्या.
पुण्याहून आलेल्या कर्नाटक परिवहन बसमधील एकाही प्रवाशाकडे आर टी पी सी आर रिपोर्ट नसल्याने चेक पोस्ट वरील पोलिसांनी ही कारवाई केली.रात्री कर्नाटकात येणारी एक खासगी ट्रॅव्हल बस देखील प्रवाशांकडे रिपोर्ट नसल्याने परत पाठवण्यात आली.सध्या महाराष्ट्रात विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे.त्यामुळे बेळगाव जिल्ह्यातील कोगनोळी तसेच कागवाड चेक पोस्टवर हाय ॲलर्ट जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्या सगळ्या वाहनातील प्रवाशांच्या कडे आर टी पी सी आर रिपोर्ट असेल तरच कर्नाटकात प्रवेश दिला जात आहे.
जिल्हा पोलिस प्रमुखांनी चेकपोस्टवर कडक तपासणी करण्याचे आदेश दिल्यामुळे दिवस रात्र पोलीस कर्मचारी प्रवाशांना आर टी पी सी आर निगेटिव्ह रिपोर्ट असल्याशिवाय कर्नाटकात प्रवेश देत नाहीत.