बेळगाव, दि.९- हिंदवाडी तिसरा क्रॉस येथील रहिवासी सुजाता विलास गौंडाडकर (५२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
स्वभावाने त्या अत्यंत धार्मिक वृत्तीच्या होत्या.अनेक धार्मिक आणि सामाजिक संस्थांच्या कार्यात त्यांचा मोलाचा सहभाग होता.त्यांच्या पश्चात कर्ता मुलगा,सून,पुतणे,पुतण्या असा परिवार आहे.त्यांच्यावर सदाशिव नगर स्मशानभूमीत शनिवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.