मनरेगा कामगारांचा तालुका पंचायतवर मोर्चा
बेळगाव: किणये ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या जानेवाडीतील गावकऱ्यांना अजून पर्यंत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (MGNREGA) माध्यमातून किणये पंचायतीने काम दिलेले नाही असे राहुल पाटील यांच्या निदर्शनास आले त्यावेळी त्यांनी वेळोवेळी महिलांच्या बैठका घेऊन त्यांना मार्गदर्शन केले व याबाबत पंचायतीला भेट देऊन महिलांच्यामार्फत कामासंदर्भात विचारणा केली तेव्हा कर्मचाऱ्यांनी वेळकाढूपणा करत त्यांना काम दिले नाही तेव्हां श्रमिक अभिवृद्धी संघातर्फे जेष्ठ समाजसेवक शिवाजी कागणीकर यांच्या मार्गदर्शनानुसार राहुल पाटील यांनी कायक बंधूंच्या नेतृत्वाखाली दिनांक 6/7/2021 रोजी सकाळी बेळगांव मधील तालुका पंचायत ऑफिसवर मोर्चा काढला, तालुका पंचायत ऑफिसमधील एडी साहेबांनी मोर्च्याला सामोरे जाऊन महिलांच्या (वर्षांतून 100 दिवस रोजगाराचे काम) कामासंदर्भातील अडचणी समजावून घेतल्या व त्या दूर करण्याचे आश्वासन दिले, कविता गुरव, रेणुका पावशे, कविता सांबरेकर, विठ्ठल देसाई, ज्ञानेश्वर पाटील यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले यावेळी बहुसंख्य महिला व पुरुष कामगार उपस्थित होते.