श्री गणेशोत्सव मंडळ कोनवाळ बेळगांव यांच्या तर्फे सामजिक संस्थांना आर्थिक मदत
बेळगाव: कोनवाळ गल्लीचा राजा सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ कोनवाळ बेळगांव यांच्या तर्फे सामजिक संस्थांना आर्थिक मदत आज या कारोना महामारित गरीब लोकांची ज्या सामजिक संस्था विनामूल्य सेवा करीत आहेत. अशा संस्थांना मंडळाच्या कार्यकर्त्यांनी देणगी स्वरुपात आर्थिक मदत केलेली आहे. हेल्प फॉर निडीचे सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर, श्री राम सेना हिंदुस्थानचे शंकर पाटील आणि सहकारी,आणि महाराष्ट्र एकीकरण समिती यांना प्रत्येकी 11000/- अशी मिळून एकूण 33000/- रुपयाची आर्थिक मदत केलेली आहे. ही मदत करताना गल्लीतील कार्यकर्ते युवराज चव्हाण,दत्ता पाटील,अभजित सुण गार,अर्जुन गवळी,विनायक बेळगाव कर,प्रसाद कुडतुरकर,निखिल देसुरक र,केतन देसुरकर,निखिल पानकर, अक्षय वाळके,उमेश लोहार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.