माळी गल्ली मंडळाकडून शिवराज्याभिषेक दिन साधेपणाने साजरा
बेळगाव:माळी गल्ली मंडळाकडून शिवराज्याभिषेक दिन साधेपणाने साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणु किल्लेकर उपस्थित होते.त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.उमेश ताशिलदार यांनी आरती व घोषणा देऊन शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. कोरोना महामारी विरुद्ध लढा देण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याच्या औषधाचे वाटप करण्यात आले.यावेळी मंडळाचे अध्यक्ष मेघन लंगरकांडे. भाऊराव चौगले, प्रभाकर बामणेकर, भुषण हेबाळकर, अभिजित लंगरकांडे, प्रतीक बंडमजी, भाऊराव कितुरकर, व महिला उपस्थित होते.