या वर्षी श्री शनी जयंती साधेपणाने होणार साजरी
या वर्षी श्री शनी जयंती वैशाख अमावास्या गुरुवार दि.१० जून रोजी आहे.त्या निमित्त पाटील गल्ली येथील श्री शनी मंदीरात शनी शांती,शनी होम ,अलंकार सेवा , तैल अभिषेक आदी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.सध्या राज्य सरकारची कोरोना नियमावली लागू असल्याने अत्यंत साधेपणाने श्री शनी जयंती साजरी करण्यात येणार आहे.
ज्या भक्तांना अभिषेक आणि अन्य सेवा करायची असेल त्यांनी मंदीरात सकाळी आठ ते दहा या वेळेत संपर्क साधावा.सध्या लॉक डाऊन असल्याने भक्तांचे अभिषेक करून लॉक डाऊन संपल्यावर प्रसाद देण्यात येईल.अभिषेक करण्यासाठी नाव नोंदणी अगोदर करणे आवश्यक आहे. मंदिरा तर्फे समस्त विश्वातील जनतेच्या कल्याणासाठी आणि कोरोना नायनाट व्हावा म्हणून विशेष पूजा त्या दिवशी करण्यात येणार आहे असे मंदिराच्या ट्रस्टी आणि पुजारी यांनी कळवले आहे.