अबकारी खात्याची धाड : हातभट्टी दारू,बियर आणि अन्य ब्रँडचे मद्य जप्त
यमकनमर्डी गावातील एका घरात अबकारी खात्याने धाड टाकून हातभट्टी दारू,बियर आणि अन्य ब्रँडचे मद्य जप्त केले. हुल्यानुर येथून हा दारुसाठा विक्रीसाठी आणण्यात आला होता.२४० लिटर हातभट्टी दारू,अन्य ब्रँडचे ९१ लिटर मद्य आणि बियर अबकारी खात्याने जप्त केली.इराप्पा याल्लाप्पा गोरव याला या प्रकरणी अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले.प्रकाश बसप्पा बरगली हा फरार झाला असून त्याला अबकारी खाते पकडण्यासाठी शोध घेत आहे.चिकोडी विभागाचे अबकारी निरीक्षकांनी याची नोंद केली आहे.बेळगाव उत्तर जिल्ह्याचे अबकारी खात्याच्या उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.