महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कोविड केअर सेंटरला जीवनदीप फौंडेशन आणि मारुती मंदिरची साथ
बेळगाव: महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कोविड केअर सेंटरला जीवनदीप फौंडेशन आणि मारुती मंदिर टिळकवाडी यांच्या सौजन्याने दररोज रुग्णाच्या भोजनाची व्यवस्था करण्यात येत आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कोविड केअर सेंटरची सुरुवात झाल्यापासून आजपर्यंत नियमितपणे भोजन देण्यात येत आहे.रुग्णांना उपायुक्त असा सगळ्या जीवसत्वांचा समावेश असलेला सकस आहार रुग्णांना देण्यात येत आहे.दररोज भोजनात वेगवेगळ्या भाज्या देण्यात येतात.एक गोड पदार्थ देखील जेवणात समाविष्ट केलेला असतो.
दररोज दुपारी शंभर आणि रात्री शंभर रुग्णांना भोजन देण्यात येत आहे .महिला आघाडी तर्फे देखील दररोज रुग्णाच्या मागणीनुसार भाकरी आणि चपाती देण्यात येत आहे.
#dmedia #corona #coronavaccine #lockdown. #covidcarecentar #mes @shubhamshilkhe