ऑक्सिजन कॉनसेंट्रेटर बँकला सुरुवात
बेळगाव:रोटरी क्लब ऑफ बेळगावने के एल ई सेंटेनरी
चॅरिटेबल हॉस्पिटलच्या सहकार्याने ऑक्सिजन कॉनसेंट्रेटर बँक हा उपक्रम सुरू केला आहे.के एल ई संस्थेचे कार्याध्यक्ष आणि के एल ई विश्व विद्यालयाचे कुलगुरू डॉ.प्रभाकर कोरे यांच्या हस्ते ऑक्सिजन कॉनसेंट्रेटर बँकचे उदघाटन करण्यात आले.रोटरी क्लब ऑफ बेळगाव ने पंचवीस लाख रु.किमतीचे पाच आणि दहा लिटर चे पंचवीस
कॉनसेंट्रेटर हॉस्पिटल कडे सुपूर्द केले. डॉक्टरांच्या सल्ल्याने घरीच उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांना हे ऑक्सिजन कॉनसेंट्रेटर भाडे तत्वावर देण्यात येणार आहेत.गरजूंना वेळेवर ऑक्सिजन कॉनसेंट्रेटर मिळावेत आणि मदत व्हावी म्हणून त्यासाठी नियमावली केली आहे.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हे ऑक्सिजन कॉनसेंट्रेटर रुग्णांना देण्यात येतील.या उपक्रमासाठी रोटरी फाऊंडेशन , चिंगारी ॲप,बी इंग ह्युमन द सलमान खान फाऊंडेशन,रोटरी सदस्य आणि अनेक उद्योगांनी निधी दिला आहे.रोटरी क्लब चे माजी प्रांतपाल शरद पै यांनी या उपक्रमासाठी प्रयत्न केले होते.
प्रारंभी रोटरी क्लब ऑफ बेळगाव चे अध्यक्ष डॉ.कान्होबा केळूसकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले.संजय कुलकर्णी,पराग भंडारे डॉ. उडचणकर यांनी ऑक्सिजन कॉनसेंट्रेटरची मांडणी केली.योगेश कुलकर्णी यांनीही निधी संकलन करण्यात महत्वाची भूमिका बजावली.जिल्हा प्रांतपाल संग्राम पाटील यांनी या प्रकल्पासाठी पाच लाखाचा निधी मंजूर केला.
डॉ.एच.बी.राजशेखर,डॉ.धारवाड आणि डॉ.माधव प्रभू यांचेही या उपक्रमासाठी मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले.