This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

September 2024
S M T W T F S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*शांतता भंग केल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता*

*शांतता भंग केल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता*
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

२०२१ मध्ये बेंगळूर येथे झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती विटंबने विरोधात धर्मवीर संभाजी महाराज चौक बेळगाव येथे झालेल्या आंदोलना दरम्यान दंगल घडवून शांतता भंग केल्याच्या आरोपावरून विविध गुन्ह्यांतर्गत खडेबाजार, मार्केट व कॅम्प पोलीस स्थानकामध्ये एकूण सात खटले दाखल करण्यात आले होते, यापैकी खडेबाजार पोलीस स्थानकातील दोन खटल्यांमध्ये आज निकाल देण्यात आला, आणि सर्वांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. बेळगावच्या तृतीय प्रथम दिवाणी न्यायालयाने हा निकाल दिला.

यामध्ये महाराष्ट्र एकीकरण युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर, समिती नेते श्री रमाकांतदादा कोंडुस्कर, समिती नेते मदन बामणे, शुभम शेळके,माजी महापौर सरिता पाटील, माजी उपमहापौर प्रकाश शिरोळकर, यांच्यासह सर्वांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. सर्वांच्या वतीने महाराष्ट्र एकीकरण समितीचे वकील ॲड. महेश बिर्जे, ॲड. शामसुंदर पत्तार,ॲड. प्रताप यादव, ॲड.वैभव कुट्रे, ॲड. बाळासाहेब कागणकर, ॲड. रीचमॅन रिकी नवग्रह, ॲड.हेमराज बेंचन्नवर यांनी न्यायालयीन काम पाहिले.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24