This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

September 2024
S M T W T F S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

**श्री शिवबा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, जीवननगर – कुद्रेमानी*

**श्री शिवबा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, जीवननगर – कुद्रेमानी*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जीवननगर – कुद्रेमानी येथील श्री शिवबा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यावर्षीच्या गणेशोत्सवात श्रींची मूर्ती अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद कर्नाटक राज्याचे राज्याध्यक्ष श्री रवी मारुती पाटील आणि प्राथमिक कृषी पतसंस्था सहकारी यांचे चेअरमन जोतिबा मारुती बडसकर यांच्या देणगीतून देण्यात आली.

गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी, मंडळात आरतीचा पहिला मान मूर्तीचे देणगीदार श्री रवी मारुती पाटील आणि श्री जोतिबा मारुती बडसकर यांना देण्यात आला. त्यांच्या शुभहस्ते श्रींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करून सामूहिक आरती करण्यात आली.

या सोहळ्यात मंडळाचे अध्यक्ष सोमनाथ कडलगेकर यांच्या हस्ते श्री रवी मारूती पाटील सर व सौ. रोहिणी रवी पाटील यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सापत्निक गौरव करण्यात आला. तसेच श्री जोतिबा मारुती बडसकर व सौ. शालन जोतिबा बडसकर यांचा मंडळाचे उपाध्यक्ष दवणाप्पा चाळोबा कागणकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ , स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देवून सापत्निक गौरव करण्यात आला. तसेच मधु पन्हाळकर यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले .

यावेळी रवी पाटील यांचे मार्गदर्शन संदेश देताना म्हणाले ,”आपल्या समाजात एकोपा, सौहार्द आणि सामूहिकता हेच गणेशोत्सवाचे खरे प्रयोजन आहे. गणपती बाप्पा हा आपल्या सर्वांचा आराध्य देव असून, त्याच्या आशीर्वादाने आपण समाजात प्रगती साधावी. गणेशोत्सवाच्या निमित्ताने एकत्र येऊन परस्परांच्या मदतीने सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगती साधणे हीच खरी भक्ती आहे.”

यंदाचे हे दहावे वर्षे असून
याप्रसंगी मंडळाचे सन 2024 चे संचालक मंडळ अध्यक्ष – सोमनाथ अर्जुन कडलगेकर , उपाध्यक्ष -दवणाप्पा चाळोबा कागणकर , सेक्रेटरी -हनुमंत पन्हाळकर ,खजिनदार – रवळू ठाणू गुरव ,कार्याध्यक्ष – परशुराम नागो काकतकर , हिशोब तपासणीस -उत्तम दत्तू पाटील , विनोद विष्णू पन्हाळकर , रमेश जनबा कागणकर , सदस्य – जोतिबा गोपाळ पन्हाळकर , राजू विष्णू पन्हाळकर , विनायक पुंडलिक गुरव , आकाश बाळाराम पाटील , संदीप अर्जुन काकतकर , विवेक गोपाळ पाटील , वैजनाथ कागणकर , जोतिबा कागणकर , जोतिबा पन्हाळकर आणि सुनिल अर्जुन काकतकर मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते .
इलेट्रोकल मेस्त्री पुंडलिक गुरव , महेश पाटील , मनोहर कागणकर , विष्णू पन्हाळकर उपस्थित .

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि संयोजन परशराम काकतकर यांनी केले.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24