गणेश चतुर्थीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी झाली होती.गर्दीमुळे शहरात अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली होती.सजावटीचे साहित्य,फळे आणि पूजेसाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी लोकांनी बाजारपेठेत गर्दी केली होती.पन्नास रुपया पासून ते चारशे रुपयांना पाच फळांची विक्री करण्यात येत होती.सजावटीसाठी आर्टिफिशियल फुलांना आणि हाराना मोठी मागणी होती.
विविधरंगी फुले , फुलांच्या आकर्षक माळा ,किरीट,मोत्याचे तोरण,वेगवेगळी झुंबर,मखर,पूजेचा चौरंग ,वेगवेगळ्या प्रकारच्या दिव्यांच्या माळा विक्रीसाठी उपलब्ध आहेत.दिवसभर रिमझिम पाऊस सुरू होता पण पावसाची तमा न बाळगता लोकांनी गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी गर्दी केली होती.शहरात अनेक ठिकाणी मंडप उभारणीचे काम पूर्ण झाले असून विद्युत रोषणाई आणि सजावटीच्या कामाला सुरुवात झाली आहे.