महाद्वार रोड येथे जयघोष आणि ढोल ताशांच्या गजरात श्री गणेशाचे आगमन
बेळगांव:दिनांक ०४ सप्टेंबर २०२४ रोजी मराठा गल्ली महाद्वार रोडच्या श्री गणेश मुर्तीचा आगमन सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. शहरातील टिळक चौकातुन माजी आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते श्रीगणेशाची पुजा करुन मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली. तेथुन शनि मंदिर, कपिलेश्वर रोडहून मराठा गल्ली महाद्वार रोडकडे मिरवणुक नेण्यात आली.
वज्रनाद ढोल ताशा पथकाचे ५० ढोल, १५ ताशे व १६ ध्वजांसह एकुन १५० ध्वजकरी मिरवणुकीत सहभागी होवुन श्री गजाननाला मानवंदना केल्या.
यावेळी भाजपा राज्य उपाध्यक्ष व माजी आमदार अनिल बेनके म्हणाले की, गणेश चतुर्थीच्या शुभ पर्वावर एक अनोखा उत्सवाचा प्रारंभ जिथे परंपरा आणि आधुनिकतेचा संगम साकारतो. या आगमन सोहळ्यात पारंपारिक मैदानी खेळांची प्रात्यक्षिके जसे मल्लखांब प्रात्यक्षिका व महिलांकडुन शौर्य धडे प्रात्यक्षिका तलवार बाजी दाखविण्यात आली. बैलजोडी, ध्वज पथक यासह सामाजिक संदेश देणारे फलक तसेच बलात्काराच्या घटनांचा निषेध फलक लावुन अशा ज्वलंत प्रश्नाबद्दल सामाजिक बांधिलकी ठेवुन वेगवेगळ्या पद्धतीने समाजाला संदेश देण्याचे काम मराठा गल्ली महाद्वार रोडच्या सार्वजनिक श्री गणेश उत्सव मंडळच्या कार्यकर्त्यांनी केल्याबद्दल त्यांचे आभार मानले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन भाजपा राज्य उपाध्यक्ष व माजी आमदार अनिल बेनके, मंजुनाथ अनवेकर, विनायक जिगजिन्नी, राजु भातकांडे, विवेक पाटील, वृषभ चिखलकर, दौलत जाधव, मंदार गावडे, संदिप भातकांडे, सम्राट पाटील, रुपेश पाटील, संजय काळसेकर, प्रकाश पाटील, एकनिष्ठ युवक मंडळ, सार्वजनिक श्री गणेश उत्सव मंडळ यांच्यासह मराठा गल्लीचे पंच, जेष्ठ नागरिक व शेकडो गणेशभक्त उपस्थित होते.