ऑपरेशन मदत ग्रुप तर्फे खानापूर तालुक्यातील दुर्गम भागातील चिखले प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना ‘ग्रामीण शिक्षण अभियान’ अंतर्गत शैक्षणिक साहित्याचे वाटप –
‘ग्रामीण शिक्षण अभियान’ अंतर्गत खानापूर तालुक्यातील अतिदुर्गम असलेल्या चिखले येथील सरकारी उच्च प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वह्या, पेन्सिल्स, खोडरबर, शार्पनर, स्केल या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
‘ऑपरेशन मदत’ ग्रुपच्या माध्यमातून दुर्गम भागातील शालेय विद्यार्थ्यांना जेथे शैक्षणिक साहित्य वेळेवर मिळणे कठीण आहे किंवा तेथील नैसर्गिक परिस्थितीमुळे ते शक्य होत नाही तसेच कौटुंबिक परिस्थितीमुळे परवडत नाही, अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ‘ग्रामीण शिक्षण अभियान’ हा उपक्रम गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत करण्यासाठी सुरू करण्यात आला आहे, या अभियानांतर्गत दुर्गम भागातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाते.
चिखले प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना कार्यकर्ते अनिल कारीत, प्रीतम शहा, राहुल पाटील यांनी आपल्या मनौगत व्यक्त केले.
चिखले शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना ‘ऑपरेशन मदत’ ग्रुपचे आदरणीय सदस्य अनिल कारीत, प्रीतम शहा, लायन् भालचंद्र पाटील, डॉ. राजश्री अनगोळ, सागर सुतार, विकी मेहता, श्वेता मॅडम, सामाजिक कार्यकर्ते अर्जुन गावडे, एसडीएमसी सदस्य आणि उपस्थित शिक्षक यांच्यामार्फत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.