बेळगाव:गांधीनगर येथील आदि मेटल गोडाऊन मधील जवळपास 30 ते 40 लाख किमतीचे तांबे,पितळ अॅल्युमिनियमच्या भांड्यांची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. गांधीनगर मधील हरी काका कंपाउंड येथील गौडर राईस मिलला लागून असलेल्या आदि मेटल गोडाऊन मध्ये चोरीची घटना घडली.
आदि मेटलचे मालक राज जोशी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की चोरट्यांनी समोरच्या दरवाजाची किल्ली तोडून आत प्रवेश केला आणि सर्वप्रथम सीसीटीव्ही कॅमेरा तोडला व टीव्हीची मोडतोड केली.यानंतर या चोरट्याने आतील दरवाजा तोडून गोडावन मध्ये प्रवेश केला असावा, मोठमोठी तांबे, पितळ, अॅल्युमिनियमची भांडी चोरी केल्याचे त्यांनी सांगितले, तीन महिन्यांमध्ये गोडाऊन मध्ये दुसरी चोरी असल्याचेही समजते अशा चोऱ्यांचे प्रकार शहरामध्ये वाढू लागल्याने पोलिसांच्या समोर आव्हान उभा राहिले आहे.