दिनांक 10/07/2024 बुधवार रोजी शाळा नं 5 चवाट गल्ली येथे *अनुभव कथन* हा कार्यक्रम झाला.या कार्यक्रमासाठी येळळूर चे सुपुत्र व सध्या अमेरिकेत स्थायिक असलेले व तेथे स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय निर्माण केलेले श्री विवेक कंग्राळकर हे उपस्थित होते, आजच्या कार्यक्रमास या शाळेचे विद्यार्थीप्रिय माजी शिक्षक श्री ल ना कंग्राळकरसर अध्यक्ष होते.
मुचंडीकर सर यांनी प्रास्ताविक आणि स्वागत केले. श्री विवेक कंग्राळकर सर यांनी मुलांशी हसत खेळत संवाद साधला. याशिवाय मातृभाषेतून शिक्षणाचे महत्व पटवून दिले. व ठामपणे आपण मराठी माध्यमातून शिकलो म्हणून माझ्या प्रगतीमध्ये हे कुठेही अडकाठी न आल्याचे आवर्जून सांगितले. मात्र त्यांनी जिद्द व मेहनत घ्यायला हवी तर यश नक्कीच मिळते.
त्यानंतर दीपक किल्लेकर यांनी देखील मातृभाषेतून शिक्षणाचे महत्व अधोरेखित केले. सर्व पालकांना शाळेत सुरू असलेल्या उपक्रमाची नोंद घेऊन मराठी माध्यम पटसंख्या वाढीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
सेंट्रल हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री विश्वजीत हसबे सरांनी ल ना कंग्राळकर सरांच्या आठवणींना उजाळा देऊन त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
अध्यक्षीय भाषणात मुलांना सरांनी मनापासून अभ्यास करण्यास आणि व्यायाम करण्यास सांगितले व पालकांनीही विद्यार्थ्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, पालकांनीही मोबाईल पासून लांब राहिलं तरच विद्यार्थीही मोबाईल लांब ठेवतील असा पालक जबाबदारीचा कानमंत्र दिला.
सदर कार्यक्रमास माजी विद्यार्थी संघांचे रवी नाईक कडोलकर डॉक्टर बेळगावकर पदाधिकारी, पालक व sdmc पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पी.ए. माळी सर यांनी केले. आभार श्री पाटील सर यांनी मानले….