बेळगाव : जीपीएम AEE दुरडेश्वर महादेव बन्नूर यांच्या घरावर लोकायुक्त अधिकाऱ्यांनी गुरुवारी सकाळी धाड टाकून महत्त्वाची कागदपत्रे तपासली असून त्यांनी मिळकतीपेक्षा जास्त मालमत्ता असल्याचा आरोप आहे.
लोकायुक्त अधिकाऱ्यांनी बेळगाव तालुक्यातील येळळूर गावच्या सीमेवर असलेल्या बन्नुर यांच्या घरावर धाड टाकली आणि घराची कसून तपासणी केली.
याआधी दुरडेश्वर महादेव बन्नूर यांच्या घरावर धाड पडली होती .त्यावेळी लोकायुक्त अधिकाऱ्यांनी महत्त्वाची कागदपत्रे गोळा करून घेऊन गेले होते.त्याचाच भाग म्हणून आज पुन्हा त्यांच्या घरावर छापा टाकण्यात आला.
लोकायुक्त डीवायएसपी भरत रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने धाड टाकून कसून तपासणी केली.