निसर्ग सौंदर्याने नटलेल्या बेळगावकडे सध्या मुंबईमधील कलाकारांचा चित्रीकरणासाठी ओढा वाढलेला आहे शुभम मुधोळकर मूळचे बेळगाव सध्या राहणार मुंबई या कलाकाराने आपल्या एका मराठी अल्बम सॉंग नुकतेच चित्रीकरण बेळगावात केले.
“एक झलक तुझी” असे या अल्बम सॉंग चे नाव आहे. हे गाणे बेळगाव मधील लेखक दिग्दर्शक संतोष चंद्रकांत सुतार व राशी बेळगावकर यांनी लिहिले व गायलेले आहे तसेच या गाण्याची संगीत रचना दर्शन सुतार यांनी केलेली आहे तर हे गाणे अनिकेत हेरंजाळ यांच्या स्वरांक म्युझिकल स्टुडिओ येथे ध्वनिमुद्रित करण्यात आले.
या गाण्याच्या चित्रीकरणात शुभम मुधोळकर व श्वेता सकपाळ हे मुंबई येथील कलाकार मुख्य भूमिकेत आहेत या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन बेळगाव मधील मॅट्रिक्स डान्स अकॅडमी चे सनी सोनार यांनी केले आहे तसेच या गाण्यात बेळगाव मधील दडपण चित्रपटातील कलाकार महादेव होनगेकर यांनी विशेष भूमिका केलेली आहे.
त्याचप्रमाणे रोहित जाधव दिनेश अरुंदे लता मोरे विनायक मुतगेकर व इतर बेळगाव मधील नृत्य कलाकारांचा समावेश आहे. या गाण्याचे चित्रीकरण जयंत शेलार या मुंबई येथील डीओपी ने केलेले आहे तर या गाण्याचे दिग्दर्शन संतोष चंद्रकांत सुतार यांनी केलेली आहे.