के एल ई हॉस्पिटल मार्गावर भले मोठे झाड पडून बराच काळ वाहतूक ठप्प झाली.हा अत्यंत वर्दळीचा मार्ग असून सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. काही कार आणि दुचाकी वाहनांचे मात्र झाड पडल्याने नुकसान झाले आहे.
के एल ई मार्गावर अनेक कॉलेज,हायस्कूल असून कोल्हापूरला जाणारी वाहने देखील याच मार्गाने जात असतात.झाड मोठे असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली.झाड पडल्याची माहिती कळताच वन खात्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी झाड कापून रस्ता मोकळा करण्यासाठी प्रयत्न सुरू केले.दोन तासाहून अधिक काळ या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती.
गेल्या पाच दिवसांपासून बेळगाव आणि परिसरात संततधार पाऊस सुरू आहे.चार दिवसांपूर्वीच हिंदवाडी भागात देखील नारळाचे झाड पडून त्या भागातील वीज पुरवठा ठप्प झाला होता.झाड पडण्याची ही आठवड्यातील दुसरी घटना आहे.