भाड्याची खोली बदलण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात पतीने रागाच्या सलमा इकुरोट्टी भरात पत्नीच्या डोक्यात खोरे घालून खून केला. सलमा गुराप्पा इकुरोट्टी (२८, रा. खानापूर नाका, विटा) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना बुधवारी रात्री उघडकीस आली. संशयित पती गुराप्पा शंकराप्पा इकुरोट्टी (३०, सध्या रा. विटा, मूळ गाव याडहळ्ळी, ता. शोरपुरा, जि. यादगीर, कर्नाटक) याला अटक केली आहे. याप्रकरणी पोलिस महेश संकपाळ यांनी फिर्याद दिली आहे.
येथील खानापूर नाका येथे खोली भाड्याने घेऊन गुराप्पा व सलमा राहत होते. ते मूळचे कर्नाटकातील यादगिरी जिल्ह्यातील. ते मजुरी करीत होते. त्यांच्यात किरकोळ कारणावरून नेहमी वाद होत असे. सध्या राहात असलेली भाड्याची खोली बदलून दुसरीकडे जायचे, या कारणावरून बुधवारी रात्री ८ वाजल्यापासून त्यांच्यात वादावादी सुरू होती. संशयिताने पत्नीच्या डोक्यात खोऱ्याने वार केल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.
पोलिस उपअधीक्षक विपुल पाटील आणि पोलिस निरीक्षक शरद मेमाणे तसेच पोलिस उपनिरीक्षक पूजा महाजन यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मृत सलमाच्या मोबाईलमधील माहिती घेऊन या घटनेची माहिती पोलिसांनी तिच्या नातेवाईकांना कळवली.