बेळगाव:येणाऱ्या श्री.मंगाई देवी यात्रेनिमित्त समस्त पाटील गल्लीतील पंच मंडळी आणि प्रमुख पुजाऱ्यांनी आमदार अभय पाटील यांची भेट घेऊन तिथे होणाऱ्या विकासाबद्दल आणि उर्वरित राहिलेल्या कामाबद्दल चर्चा केली ,यावेळी आमदार अभय पाटील यांनी ग्वाही दिली की,येणाऱ्या 25 जुलै पर्यंत राहिलेली कामे पूर्ण करून देऊ तसेच अजून काही कामे असतील तरी सांगावी असे सांगितले ,त्याचबरोबर संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत सूचना देऊन येत्या बुधवारी आपण उपस्थित राहून राहिलेल्या कामाला चालना देण्यात येणार आहे असेही सांगितले . व दर गुरुवारी आणि रविवारी उपस्थित राहून येत्या 25 जुलै पर्यंत ही सर्व कामे पूर्ण करणार असे ते म्हणाले..
याप्रसंगी सुभाष चव्हाण पाटील, देवदास चव्हाण पाटील, मानसिंग चव्हाण पाटील, मनोहर चव्हाण पाटील, संदीप चव्हाण पाटील, विनायक चव्हाण पाटील, प्रकाश कडोलकर, अनंत चव्हाण पाटील उपस्थित होते.