कर्नाटक आणि महाराष्ट्रात प्रसिध्द असलेला कोगनोळी येथील कर्नाटकी बेंदूर सण उत्साहात पार पडला.माजी मंत्री विरकुमार पाटील यांच्या मानाच्या बैलजोडीचे पूजन करून कर कार्यक्रमाला प्रारंभ झाला. कर तोडण्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी कर्नाटक आणि महाराष्ट्रातून हजारो लोक उपस्थित होते.गावातील प्रमुख मार्गावर बैलाला पळवून कर तोडण्याचा कार्यक्रम पार पडला.
घरोघरी देखील पारंपरिक पद्धतीने कर्नाटकी बेंदू र सण उत्साहात पार पडला.सकाळी बैलांना गरम पाण्याने अंघोळ घालून त्यांना सजवण्यात आले होते.त्यानंतर त्यांना विविध प्रकारचे मसाले आणि पुरण पोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला . शेडूच्या बैलांचे देखील घरोघरी पूजन करून त्यांना पुरण पोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला. कर तोडण्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी हजारो आबालवृद्धांनी गर्दी केली होती.