न्यायालयात पाकिस्तान झिंदाबाद घोषण देणाऱ्या कुख्यात गुंड जयेश पुजारी याला वकील आणि नागरिकांनी चांगला चोप दिला.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना हिंडलगा कारागृहातून धमकी दिल्या प्रकरणी चर्चेत आलेल्या जयेश पुजारीने बेळगावच्या न्यायालयात पाकिस्तान झिंदाबाद घोषणा दिल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला होता.
पोलिसांनी त्वरित हालचाल करून जयेश पुजारी याला न्यायालयातून बाहेर आणले.पाकिस्तान झिंदाबाद घोषणा दिल्याने संतप्त झालेल्या वकील आणि जनतेने चांगला चोप दिला.पोलिसांनी त्याला न्यायालयाच्या बाहेर बंदोबस्तात आणले त्यावेळी देखील काही जण जयेश पुजारी याच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न करत होते.अखेर पोलिसांनी वाहनातून जयेश पुजारी याला ए पी एम सी पोलीस स्थानकात नेले.कर्नाटकचे वरिष्ठ आय पी एस पोलीस अधिकारी अलोक कुमार यांना धमकी दिल्या प्रकरणी सुरू असलेल्या खटल्याच्या तारखेला उपस्थित राहण्यासाठी जयेश पुजारी याला पोलिसांनी न्यायालयात आणले होते.त्यावेळी त्याने पाकिस्तान झिंदाबाद घोषणा देऊन गोंधळ घातला.