संगमेश्वरनगरमध्ये गृह उद्योगासाठी महिलांना तसेच छोट्या उद्योगांना कर्ज देणारी श्री कॉमर्स सर्व्हिस प्रोव्हाईड लि. नावाची मायक्रोफायनान्स खासगी बँक आहे. उपरोक्त संशयितांनी ६ मे रोजी या बँकेचे शटर तोडून आतील छोटे लॉकर्स पळवून नेले होते. त्यांचा शोध घेऊन त्यांच्याकडून ६५ ग्रॅमचे दागिने, मारूती कार, ३ दुचाकी, मोबाईल असा ७ लाख ५६ हजाराचा मुद्देमाल जप्त केला.
एपीएमसीचे निरीक्षक खाजा हुसेन, उपनिरीक्षक त्रिवेणी नाटीकर, उद्यमबागचे उपनिरीक्षक किरण होनकट्टी, श्रीमती एस. व्ही. बडीगेर, आय. के. मीटगार यांनी कारवाई केली. यामध्ये एपीएमसी व उद्यमबाग ठाण्यातील अजित शिपुरे, भरमा करेगार, डी. सी. सागर, बी. एम. नरगुंद, बसवराज बानसे, कंपान्ना दोड्डुमनी, गोविंदप्पा पुजार, नामदेव लमाणी यांनी भाग घेतला. पोलिस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग यांनी या पथकाचे कौतुक केले आहे.