पाटील गल्ली येथील अध्यापक कुटुंबियांच्या श्री शनी मंदिरात शनी जयंती भक्तिभावाने साजरी करण्यात आली.सकाळी श्री शनी जन्मोत्सव झाला.त्या नंतर रुद्राभिषेक आणि तैलाभिषेक करण्यात आले.दुपारी तैला भिषेक झाल्यावर अलंकार सेवा करण्यात आली.त्या नंतर महानैवेद्य दाखवून महाआरती करण्यात आली.
मंदिरात सकाळपासून भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. मंदिरतर्फे संपूर्ण दिवसभर प्रसादाचे वितरण करण्यात आले.संपूर्ण विश्वात शांती नांदावी,जगातील समस्त लोकांना उत्तम आयुरारोग्य लाभो.यावर्षी पाऊस चांगला पडावा आणि बळीराजाला पीक चांगले मिळुदे अशी प्रार्थना करण्यात आली.
मंदिरातील धार्मिक विधींचे पौरोहित्य वे. शा. स.नागेश उर्फ बाळू देशपांडे यांनी केले.मंदिराचे ट्रस्टी आनंद अध्यापक,प्रकाश अध्यापक,विलास अध्यापक आणि निरंजन अध्यापक यांनी विशेष परिश्रम घेतले.रात्री उशिरा पर्यंत भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.