शॉर्ट सर्किटमुळे आग लागून गॅरेज आगीच्या भक्षस्थानी पडल्याची घटना कागवाड तालुक्यातील शिरगुप्पी येथे घडली.आगीत चार कार आणि अन्य साहित्य भस्मसात झाले.
शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आणि बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले.या आगीत चार कार, टायर आणि अन्य साहित्य भस्मसात झाले.आग लागल्यावर आजूबाजूच्या लोकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला पण तो निष्फळ ठरला.लोकांनी आगीचे वृत्त अग्निशामक दल आणि पोलिसांना कळवले.
अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि अग्निशामक दलाने आग विझविली. गॅरेजच्या बाजूला खताचे दुकान होते.अग्निशामक दलाने आग विझविली अन्यथा आजूबाजूची दुकाने आगीच्या भक्षस्थानी पडली असती.सुदैवाने या आगीच्या दुर्घटनेत कोणतीही प्राणहानी झाली नाही.