बेळगाव:कंग्राळी खुर्द येथील लक्ष्मी मंदिरात चोरी झाल्याची घटना आज सकाळीच उघडकीस आली. चोरट्यांनी काल मध्यरात्री २ च्या दरम्यान चोरी केल्याची माहिती मिळाली आहेत.
चोरट्यांनीलक्ष्मी देवीची ५ मंगळसूत्रे ,१ चांदीचा किरीट,१ चांदीचा हळदी कुंकू करंडा लंपास केला आहे. घटनास्थळी एपीएमसी पोलीस स्थानकाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन घडलेला घटनेचा पंचनामा करून एपीएमसी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .