बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आज शुक्रवारी सकाळी किणये, कर्ले, भादरवाडी, जानेवाडी व नावगे गावामध्ये समितीचे उमेदवार महादेव पाटील यांचा प्रचार केला. यावेळी सर्वत्र उमेदवार पाटील यांना उत्स्फूर्त पाठिंबा व्यक्त करण्यात आला.
बेळगाव तालुका म. ए. समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांच्या नेतृत्वाखाली युवा नेते आर. एम. चौगुले व अन्य पदाधिकाऱ्यांनी आज शुक्रवारी सकाळी कीणये, कर्ले, भादरवाडी, जानेवाडी व नावगे या गावांचा प्रचार दौरा केला. यावेळी प्रत्येक गावातील पंचमंडळी व गावकऱ्यांनी समिती उमेदवार महादेव पाटील यांना आपला पाठिंबा व्यक्त करून बहुमताने निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला.