राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू सान्वी पाटील संत मीरा शाळेत प्रथम.
बेळगाव तारीख 2 अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेची राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू सान्वी संतोष पाटील हिने 2025 मधील दहावीच्या परीक्षेत 625 पैकी 619 गुण 99.4% टक्के घेत शहरात अव्वल क्रमांक पटकाविला आहे तर शाळेत प्रथम क्रमांक पटकावित उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे. विद्या कैलास पिटुले हिने 625 पैकी 613 गुण ले 98,08 टक्के घेत शाळेत द्वितीय, सृष्टी यल्लाप्पा वाघ हिने 625 पैकी 608 गुण घेत 97.28.टक्के घेत तिसरा क्रमांक, अलिना परवेजखान पठाण हिने 625 पैकी 606 गुण 96.96% टक्के घेत चौथा क्रमांक, अमित नारायण मिरजकर यांने 625 पैकी 605 गुण 96.8% टक्के घेत शाळेत पाचवा क्रमांक पटकाविला आहे शाळेच्या 20 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी 90% टक्केहून अधिक गुण घेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.https://dmedia24.com/shiv-jayanti-chitrarath-has-come-to-the-forefront-of-the-procession/
राष्ट्रीय फुटबॉलपटू सान्वी पाटील.
सान्वी पाटील ही संत मीरा शाळेची फुटबॉल खेळाडू असून तिने झारखंड रांची व जम्मू कश्मीर येथे मागील दोन वर्षात झालेल्या स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत विद्याभारतीचे प्रतिनिधीत्व करताना सहभागी झाली होती, खेळाबरोबर अभ्यासत ही तिने प्राविण्य दाखवत उज्वल यश प्राप्त केले आहे, तिच्या या यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष परमेश्वर हेगडे ,प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, जनकल्याण ट्रस्टचे ट्रस्टी लक्ष्मण पवार शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव,तसेच विविध विषयाच्या शिक्षकांनी तिला पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.तिच्या या कामगिरीने पालक वर्ग शिक्षक वर्ग यांनी तिचे कौतुक केले आहे.