अनसुरकर गल्लीत शिवजयंती साजरी : लाठी मेळाचे आकर्षक सादरीकरण
बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त (शिव जयंती) अनसुरकर गल्लीमध्ये भारत सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने मंगळवारी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजप नेते किरण जाधव यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर लहान मुलांनी लाठी मेळा सादर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.https://dmedia24.com/sale-of-5-tonnes-of-mango-at-the-mango-festival/
कार्यक्रमात किरण जाधव, संतोष पेडणेकर, संदीप जिरगयाल, हेमंत शिंदे, प्रशांत हुंदरे यांसह स्थानिक नागरिक उपस्थित होते.
यावेळी मनोगत व्यक्त करताना किरण जाधव यांनी सांगितले की ,”छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हा या उत्सवाचा मुख्य उद्देश आहे. महाराज हे फक्त हिंदुस्थानाचेच नसून संपूर्ण जगाचे दैवत असल्याचे त्यांनी सांगितले. छ. शिवाजी महाराजांचा गनिमी कावा जगप्रसिद्ध आहे. महाराजांना रयतेचा राजा म्हणून सुद्धा ओळखले जाते. शिवरायांचे नाव नुसते घेतले तरी प्रत्येकाच्या रोमा रोमा मध्ये उत्साह निर्माण होतो असे त्यांनी सांगितले.