पक्ष संघटना मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे आदेश
खानापूर तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्री डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनी जातीय राजकारणाला विरोध करत एकात्मतेचे आवाहन केले आहे. त्यांनी कार्यकर्त्यांना पक्षसंघटना मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे आदेश दिले आहेत.
खानापूर येथे झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना डॉ. निंबाळकर म्हणाल्या, “तालुक्यातील आमच्या पक्षाच्या नेत्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी जातीभेदाचे राजकारण करू नये. मी कधीही जातीयवाद केला नाही, करणारही नाही. काही लोक स्वजातीचा डांगोरा पिटत आहेत, पण गेल्या 25 वर्षांत ते तालुक्यात का फिरले नाहीत? आता त्यांना जातीय भावना का जाग्या होत आहेत?”
त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे उदाहरण देत सर्व जात-धर्माच्या लोकांना एकत्रित काम करण्याचे आवाहन केले.”हार-जित ही राजकारणाची भाग आहे, पण आपण पक्षसंघटना मजबूत करूया,” असे त्या म्हणाल्या.
येणाऱ्या जिल्हा पंचायत-तालुका पंचायत निवडणुका लक्षात घेता कार्यकर्त्यांना जोमाने काम करण्याचे आदेश देण्यात आले.”गरिबांच्या, सामान्य जनतेच्या समस्यांवर लक्ष द्या. विकासासाठी कोणत्याही पक्षाकडे मदतीसाठी जाण्यास मी मागेपुढे पाहणार नाही,” असे निंबाळकर यांनी स्पष्ट केले. https://dmedia24.com/free-water-supply-in-yelur/
डीसीसी (डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह बँक) निवडणुकांबाबतही त्या म्हणाल्या, *”आम्ही डीसीसी निवडणुक लढवणार आहोत. लवकरच बैठक घेऊन रणरणीत तयारी करू.”* त्यांनी कार्यकर्त्यांना लगेच कामाला लागण्याचे आदेश दिले.
डॉ. निंबाळकर यांनी पक्षाच्या आंतरिक मतभेदांवरही टीका केली. *”काही नेते ‘भूमिपुत्र’ असल्याचा डांगोरा पिटत आहेत, पण त्यांनी आत्तापर्यंत तालुक्याच्या विकासासाठी काय केले?”* असे प्रश्न विचारून त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना एकजुटीने काम करण्याचा संदेश दिला.
या बैठकीत तालुक्यातील अनेक काँग्रेस नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. पक्षाच्या संघटनात्मक बांधणीवर भर देण्यात आला असून, आगामी निवडणुकांसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.