**ब्राह्मण विद्यार्थ्यांवरील भेदभावाला निषेध; उद्या बेळगावात आंदोलन**
बिदरमध्ये गेल्या चार दिवसांपूर्वी झालेल्या सीईटी (कॉमन एंट्रन्स टेस्ट) परीक्षेदरम्यान ब्राह्मण समाजाच्या विद्यार्थ्यांवर भेदभावपूर्ण वागणूक झाल्याच्या तक्रारीनंतर, समाजातील नेते आणि कार्यकर्ते आंदोलनासाठी तयार आहेत. या प्रकरणी उद्या, सोमवारी (२१ मे २०२५) बेळगाव कीत्तूर चन्नम्मा सर्कल येथे मोठ्या प्रमाणात निषेध आंदोलन करण्याचे ठरवण्यात आले आहे. यासाठी आज बेळगावमध्ये एक बैठक झाली, ज्यात आंदोलनाच्या तपशीलावर चर्चा करण्यात आली. https://dmedia24.com/inauguration-of-a-new-community-building-in-belgaum-district-court/
बैठकीत उपस्थित असलेल्या समाजनेत्यांनी ब्राह्मण विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्यायाविरुद्ध एकजुट होऊन लढा देण्याचे आवाहन केले. राम भंडारी, एस.एम. कुलकर्णी, श्रीनिवासाचार्य होनिदिब्बा, राघवेंद्र कठी, नरसिंह सवदत्ती, स्मिता श्रीधर हलगट्टी आणि अनुश्री देशपांडे यांनी स्पष्ट केले की,या अन्यायाविरुद्ध आम्ही शांततापूर्ण पण मजबूत पद्धतीने आवाज उठवणार आहोत.
उद्या सकाळी १० वाजता कन्नड साहित्य भवन येथे सर्व ब्राह्मण समाजाच्या बांधवांनी एकत्र येऊन हा प्रश्न मोठ्या प्रमाणात उपस्थित करण्याचे ठरवले आहे. आंदोलनात निषेध मोर्चा करण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यानंतर जिल्हा प्रशासनाकडे मागण्या सादर करण्यात येणार आहेत. नेत्यांनी स्पष्ट केले की, *”या प्रकरणात जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी आणि भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कायदेशीर पावले उचलली जावीत.”*