बेळगाव, १६ एप्रिल २०२५:नेहरू नगर, बेळगाव येथील DYES ज्युडो इनडोअर हॉलमध्ये कर्नाटक पोलीस ज्युडो क्लस्टर स्पर्धा संपन्न झाली. स्पर्धेचे नियोजन ज्युडो प्रशिक्षक रोहिणी पाटील आणि भैरवी मुजुमदार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
पुरुष विभागातील विजेते:
दारेप्पा एमटी (पोलीस कॉन्स्टेबल) – ६६ किलो
लिंगेश्वर एस (पोलीस कॉन्स्टेबल) – ८१ किलो
लिकित एस (पोलीस कॉन्स्टेबल) – ९० किलो
अविनाश नाईक (पीएसआय) – +१०० किलो
महिला विभागातील विजेते:
पार्वती आंबाळी (पोलीस कॉन्स्टेबल) – ७० किलो
त्रिवेणी काळकुटगी (पीएसआय) – ७८ किलो
या स्पर्धेत निवड झालेले खेळाडू पुढील महिन्यात जम्मू-काश्मीरमध्ये होणाऱ्या ऑल इंडिया पोलीस गेम्स नॅशनल स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
याप्रसंगी रमेश बोरगावी – एसपी/कमांडंट, २ बटालियन KSRP, ज्योती परांडे – इंस्पेक्टर, KSRP ,
-जी.जी. सिद्दारेड्डी- इंस्पेक्टर, KSRP उपस्थित होते.https://dmedia24.com/opposition-to-the-removal-of-unauthorized-shops-in-the-temple-area-of-u200bu200bshri-yalma-devi/
या स्पर्धेमुळे पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये खेळाडू दिमाख आणि स्पर्धात्मक भावना वाढण्यास मदत झाली. निवडलेल्या खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर यश मिळावे, अशी शुभेच्छा पोलीस विभागाने व्यक्त केली आहे.