भूस्खलन होऊन दोन कामगारांचा मृत्यू
बेळगाव महानगरपालिकेच्या हद्दीतील फ्रुट मार्केट जवळ एल अँड टी कंपनीच्या उपकंत्राटदाराकडून राबविण्यात येणाऱ्या सीवर पाईपलाईनच्या कामादरम्यान भूस्खलन झाल्यामुळे मुडलगी तालुक्यातील दोन कामगारांना प्राण गमवावे लागले. ही हृदयविदारक घटना बुधवारी बेळगाव येथील फ्रुट मार्केट जवळ घडली आहे.
मृत्युमुखी पडलेले कामगार मुडलगी तालुक्यातील पटगुंडी गावातील शिवलिंग मारुती सरावे (वय २०) आणि बसवराज सरवे (वय ३८) अशी आहे. खोदकाम सुरू असताना अचानक कोसळलेल्या मातीखाली ते दबले आणि त्यांना बचावण्याचे प्रयत्न निष्फल ठरले. https://dmedia24.com/bull/
बेळगाव महानगरपालिकेने संबंधित अधिकाऱ्यांना सखोल चौकशी करून तात्काळ कारवाईचे निर्देश दिले आहेत. तसेच, मृत कामगारांच्या कुटुंबियांना योग्य आर्थिक मदत आणि न्याय देण्यासाठी भरपाईच्या प्रक्रियेला प्राधान्य दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले.प्रकरणात उपकंत्राटदाराविरोधात कायदेशीर पावलेही उचलण्यात येतील अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.