रेल्वेचे मालवाहतूक करणारे दोन डबे रेल्वे रुळावरून घसरल्याने काही काळा करिता बेळगावला जाणाऱ्या आणि येणाऱ्या रेल्वे जवळच्या स्टेशनवर थांबवण्यात आल्या होत्या.
जिंदाल कंपनीचे स्टील घेऊन बेळगावकडे येणाऱ्या मालवाहू रेल्वेचे दोन डबे बेळगाव रेल्वे स्टेशनं पासून काही अंतरावर घसरल्याने काही वेळाकरता रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत झाले होते. रेल्वेचे डबे घसरल्यावर तात्काळ हुबळी येथून आवश्यक ती क्रेन आणि तंत्रज्ञ लगेच घटनास्थळी दाखल झाले. https://dmedia24.com/yoga-hours-begin-in-balveer-vidyaniketan/
क्रेनच्या साहाय्याने रुळावरून घसरलेले दोन डबे बाजूला करण्यात आले. त्या नंतर आता ते डबे तेथून हटवण्याचे काम सुरु आहे. या मार्गांवरून जाणाऱ्या रेल्वे नजिकच्या रेल्वे स्थानकावर थांबाविण्यात आल्या होत्या. प्रवाशांची आवश्यक ती व्यवस्था देखील रेल्वेच्या हुबळी विभागातर्फे करण्यात आली होती. तीन तासांनी थांबवण्यात आलेल्या रेल्वेना पुढे सोडण्यात आले. रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी हुबळी येथून दाखल झाले असून रूळ दुरुस्त करण्याचे काम सुरु आहे.