पोहायला जाणाऱ्यांच्या संख्येत वाढ
बेळगाव , प्रतिनिधी:
सध्या मार्च अखेर सुरू आहे. अंगाची लाही लाही होत आहे. दिवसेंदिवस बेळगावचे तापमान वाढतच आहे. ह्या वाढत्या गर्मीपासून बचाव करण्यासाठी पोहायला जाणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे.
सध्या शहरात आणि ग्रामीण भागातील तलाव आणि विहिरींवर पोहायला जाणाऱ्यांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. सकाळच्या वेळी आणि जास्त करून दुपारच्या वेळेला पोहायला जाणाऱ्यांची संख्या तलावावर आणि विहिरींवर दिसत आहे. शहरातील महानगरपालिकेच्या गोवावेस येथील स्विमिंग पूल आणि काही ठिकाणच्या विहिरींवर पोहणाऱे दिसून येत आहेत. https://dmedia24.com/rainy-brick-professionals/
पोहण्यामध्ये पटाईत असलेल्यांची संख्या जास्त आहे. त्यांच्यासोबत नवीन शिकणारे देखील पोहण्यासाठी जात आहेत. हे नवीन शिकणारे ट्यूब बांधून पोहण्याचा सराव करत आहेत. एकूणच गर्मीमध्ये ठंडे ठंडे पानीसे नहाना चाहिए असे म्हणत पोहण्याचा आनंद घेतला जात आहे. आता शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्यानंतर या पोहणाऱ्यांच्या संख्येमध्ये आणखीन वाढ होणार आहे. पण पोहणाऱ्यानी पोहताना सावधगिरी बाळगणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.